लोकशाही

  लोकशाही निवडणुका आणि सुशासन याविषयी चा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागे महाराष्ट्र शासनाचा आणि महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा उद्देश असा आहे तो म्हणजे लोकशाहीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेणे. त्यांची जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये करणे. घटनात्मक लोकशाही म्हणजे काय ?व्यक्तीच्या जीवनात लोकशाहीचे महत्त्व काय आहे ?आणि जर व्यक्तीने समाजामध्ये चांगली भूमिका बजावली तर तिला त्यामुळे काय फायदा मिळू शकेल, हे समजून घेणे या अभ्यासाचा उद्देश आहे. याशिवाय या अभ्यासाचा आणखीन एक उद्देश आहे तो म्हणजे व्यक्तीला लोकशाहीच्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती करून देणे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये तिची भूमिका काय आहे जाऊन सांगणे. हा अभ्यासक्रम अशा दृष्टिकोनातून सुरू करण्यात आला आहे की महाविद्यालयांमध्ये प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून नोंदणी करावी आणि समाजातील इतर लोकांना यासाठी प्रोत्साहित करावे  तसेच विद्यार्थ्यांनी केवळ मतदार म्हणून सहभागी न होता सर्वसाधारण निवडणूक व राजकीय प्रक्रियेतही सक्रिय सहभागी व्हावी.तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया लोकशाही म्हणजे काय 

आता 

लोकशाही या विषयाची चर्चा करू.. लोकशाही या विषयाची संकल्पना राजकीय सिद्धांताच्या केंद्र स्थानी असलेली संकल्पना आहे.दोन हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. प्राचीन ग्रीक राजकीय विचारांमध्ये लोकशाही उल्लेख आढळतो . लोकशाहीचा संकल्पनेच्या विकासामध्ये प्राचीन रोमन साम्राज्याचे योगदान मोठे आहे. प्रसिद्ध ग्रीक विचारवंत प्लेटो आणि अरिस्टोटल यांच्या लिखाणा मधून लोकशाहीचा उल्लेख आढळतो. प्लेटोच्यामते लोकशाही म्हणजे शासित लोकांचे राज्य. लोकशाही संकल्पनेत एकाच वेळी राजकीय सामाजिक तत्त्वप्रणालीस्था, संस्था व्यवस्था,  व्यवहार लोकांची मनवृत्ती .इत्यादी विविध गोष्टींमध्ये आढळून येतात. आज जगात सर्वात लोकप्रिय अशी राजकीय संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय समुदायातील अर्ध्याहून अधिक राष्ट्रांनी लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केले. राज्यशास्त्राच्या शब्दकोशात लोकशाही हा शब्द जरी हजारो वर्षापासून असला तरी त्याचा खऱ्या अर्थाने वापर विसाव्या शतकात सुरू झाला. या शतकात स्वतंत्र झालेल्या बहुसंख्य राष्ट्रांनी लोकशाही शासन व्यवस्थेचा अंगीकार केला. त्या शतकातच अनेक देशांचा प्रवास हा लोकशाहीकडे झालेला दिसून येतो. विसाव्या शतकातील दोन महायुध्ये  लोकशाही मूल्यांसाठी लढली गेली. पहिले महायुद्ध वसाहत विरुद्ध लोकशाही मुल्ये अशा स्वरूपाचे होते.तर दुसरे महायुद्ध ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारचे होते. दोन्ही महायुद्धामुळे लोकशाही मूल्यांचा विजय झाला. लोकशाही हे लोकसंमतीने चालणारे शासन आहे. आधुनिक काळात ही संमती सार्वत्रिक व प्रौढ मतदान हक्कानुसार होणाऱ्या निवडणुकीच्या मार्गाने होते. मतदानाचा विस्तृत होत गेलेला हक्क लोकशाहीचा पाया विस्तृत करीत असतो. छोट्या ग्रीक नगर राज्यात प्रचलित असलेली प्रत्यक्ष लोकशाही हे लोक सहभागाचे प्रत्यक्ष करण होते .आजच्या काळातील लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग स्थिर व व्यापक राहण्यासाठी समाज पातळीवर मूल्यांबाबत सहमती सामाजिक, व्यवहाराबाबत नियमाबाबत सहमती आणि विविध सामाजिक निर्णयांबाबत सहमती यांची आवश्यकता असते. बहुमताने अल्पमताचे म्हणणे ऐकून घेण्याची आणि त्यातील योग्य मताचे सहमती मध्ये रूपांतर करण्याची तयारी आणि सहमती असेल तर मतविरोधाची सर्व मान्य पद्धती यावर लोकशाहीचे यश अवलंबून असते. बहुमताची शासन आणि अल्पमताचे हक्क यात समतोल साधने यामुळे लोकशाही गतिमान राहते, राजकीय दृष्टीने सहमती संमती व सहकार्य यावर लोकशाही शासनाचा भर असला, तरी शासन चालवण्यापेक्षा त्याच्या दिशेला लोकांवरती व प्राथमिक वळण देणे त्यामागे अभिप्रेत आहे. समाज जीवनातील विशिष्ठ मुल्ये आणि आचरण पद्धत्ती जाणीवपूर्वक आग्रह लोकशाही व्यवस्थेमध्ये धरला जातो. लोकशाहीचा अर्थ लोकशाही हा शासनाचा अत्यंत प्राचीन प्रकार आहे प्राचीन ग्रीक नगर राज्यातील प्रत्यक्ष लोकशाहीच्या जागी राष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्राथमिक लोकशाही पद्धत सुरू झाली आणि आजच्या काळात जवळजवळ अर्ध्या जगाची शासन प्राथमिक लोकशाहीच्या तत्त्वानुसार चालत असलेले दिसून येते.  प्राचीन ग्रीक विचारवंत प्लेटो पासून ते आजपर्यंत राज्यशास्त्रामध्ये लोकशाही मध्यवर्ती विषय राहिलेला आहे. लोकशाहीला इंग्रजीमध्ये डेमोक्रसी असे म्हणतात .त्याची उत्पत्ती डेमोस म्हणजे लोक आणि क्रेटोस म्हणजे  सत्ता. या शब्दापासून झाली त्याचा अर्थ लोक आणि सत्ता असा होतो . म्हणून डेमोक्रेसी  म्हणजे लोकांची सत्ता किंवा लोकांचे राज्य होय. लोकसत्ता व लोकशाही बहुसंख्य लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही असाही अर्थ घेतला जातो.  अब्राहम लिंकन यांनी लोकांचे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेली राज्य अशी व्याख्या केली आहे . लोकशाही हा केवळ शासन प्रकार नाही तर तो एक जीवन मार्ग आहे. लोकशाही ही एक नैतिक संकल्पना आहे. ग्रीक नगर राज्यांमध्ये शासनाचे सर्व निर्णय नगरातील सर्व नागरिकांची सभा बोलावून प्रत्यक्ष मतदानातून घेतली जात असत . म्हणून तेथील लोकशाहीला प्रत्यक्ष लोकशाही असे म्हणत. परंतु येथे लोकशाही दीर्घकाळ टिकाव धरू शकली नाही. पुढील काळात इंग्लंडच्या जनतेने राजाकडून नागरी हक्काची सनद मिळवली तिला मॅग्नाचार्टा असे म्हणतात.  आधुनिक लोकशाहीचा तो पहिला टप्पा मांडला जातो. त्यानंतर अमेरिकेतील 13 वसाहतींनी ब्रिटिश सत्ता जुगारून देऊन लोकशाही स्वरूपाचे संविधान स्वीकारले फ्रेंच जनतेने तेथील अनियंत्रित राजेशाही सरंजामदार आणि बुरसटलेली धर्मसत्ता याच्या विरुद्ध बंड पुकारले आणि फ्रान्सची राज्यक्रांती घडून आली. त्यानंतरही खरी लोकशाही मिळवण्यासाठी तेथील जनतेने पुढील १०० वर्ष संघर्ष केला. औद्योगिक क्रांतीमुळे लोकशाहीच्या जडणघडणीस पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात चालला मिळाली. नवनवीन वैज्ञानिक शोध लागले . यंत्रांची निर्मिती झाली मोठे  कारखाने निघून त्यात  हजारो कामगारांना रोजगार मिळाला. उत्पादनात वाढ झाली. शेती व्यवसाय दुय्यम ठरला. त्यामुळे कामगार वर्गात जागृती झाली. त्यांची जाणीव झाली. शिक्षणातून नव मूल्यांचे संस्कार घेतलेले लोक हक्कासाठी लढू लागले .कालांतराने त्यांना यश मिळाले. मताधिकार मिळाला. त्यांचा विस्तार झाला आणि लोकशाही अस्तित्वात आली. संपूर्ण जगामध्ये लोकशाहीचा मूल्य विचार व आदर्श स्वीकारले जाऊ लागले.लोकशाही म्हणजे  केवळ राजकीय व्यवस्था नाही तर तो जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. व्यक्तीच्या सर्व जीवनात आणि संबंधात लोकशाही मूल्य प्रभावीपणे व्यक्त होणे खऱ्या अर्थाने लोकशाहीला अपेक्षित आहे.

 लोकशाहीच्या व्याख्या

लॉर्ड ब्राईस यांनी लोकशाही स्पष्ट करताना असे म्हटले आहे राज्याची सत्ता समजती सर्व लोकांच्या हाती सामुदायिक स्वरूपात देण्यात आलेला शासन प्रकार म्हणजे लोकशाही होत.

 तर अब्राहम लिंकन यांच्या मते लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांच्यासाठी आणि लोकांच्या कडून चालवले गेलेले शासन होय.

 प्राध्यापक सिली यांच्यामध्ये लोकशाही हा प्रत्येकाचा सहभाग असणारा शासन प्रकार आहे. 

 म्यकफार्सन यांच्या मते लोकशाही म्हणजे शासन निवडण्याचा आणि त्याद्वारे कायदे बनवण्याचा राजकीय निर्णय घेण्याचा प्रकार आहे .

लिपसेट यांच्यामध्ये लोकशाही म्हणजे अशी राजकीय व्यवस्था की ज्यामध्ये लोकांना आपले शासन करते बदलण्याची नियमित घटनात्मक संधी मिळते.आणि  अशा सामाजिक व्यवस्था की ज्यामध्ये बहुसंख्य लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून महत्वपूर्ण धोरणांना निर्णयांना प्रभावित करण्याची संधी मिळते.

 सरतोरी यांच्या मते लोकशाही शासन व्यवस्था म्हणजे अशी शासन व्यवस्था की जी शासन करताना जबादेई आणि उत्तरदायी बनविते. या व्यवस्थेची परिणामकारकता  राजकीय नेतृत्वाच्या कौशल्य गुणावर आधारलेली असते. 

हेरोडेट यांच्या मते ज्या समाजात समान हक्क असतात व जेथे राज्यकर्ते आपल्या कृत्यांना जबाबदार असतात तोच समाज होय. 

जोन स्तुअर्द मिल यांच्यामध्ये मते लोकशाही ही शासन प्रणालीचा असा प्रकार आहे की ज्यात सर्व लोक किंवा त्यांच्यापैकी त्यांनीच निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत राजकीय सत्तेचा वापर करतात. 

रिओ ख्रीसचसन यांच्या मते लोकशाहीत नागरिक स्वतःहून त्यांच्यावरील शासनाला  मान्यता देतात  व राज्यकारभारात बहुसंख्येने सहभागी होतात .

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते लोकशाही हा असा शासन प्रकार आहे की ज्यात सामाजिक व आर्थिक परिवर्तन होते . शांततामय व कायदेशीर मार्गाने ते होते . ती व्यवस्था म्हणजे लोकशाहीचे होय . 

विभिन्न स्वरूप

पाहताना आपणास असे दिसते की विसाव्या शतकात लोकशाहीच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक अशा पैलूंचा विकास झाला. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक ही लोकशाहीची विविध रूपे आहेत . राजकीय लोकशाही  हा शासनाचा प्रकार आहे. या प्रकारांमध्ये लोक स्वतः प्रत्यक्षरीत्या किंवा प्रतिनिधी द्वारे शासन सत्तेचा उपयोग करतात . राजकीय लोकशाहीमध्ये प्रौढ नागरिकाला भाषा ,जात , धर्म,  वंश , संपत्ती,  सामाजिक दर्जा प्रदेश या आधारावर कोणताही भेदभाव न करता मतदानाचा अधिकार दिला आहे. प्रौढ नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात नाही . राजकीय लोकशाहीमध्ये निवडणुकीस उभे राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. वैधानिक मार्गाने शासन बदलण्याचा अधिकार लोकांना असतो. राजकीय पक्षांची निर्मिती मताधिकार,  राजकीय लोकशाहीचा मुख्य उद्देश आहे. काही देशात राजकीय लोकशाहीचा अभाव दिसून येतो. साम्यवादी देशात आर्थिक लोकशाहीवर भर दिला जातो. त्यामुळे राजकीय लोकशाही मर्यादित होते. अशा देशात इतर राजकीय पक्ष निर्माण करण्याची स्वातंत्र्य नसते. तसेच शासनाचे धोरण आणि क्रया बद्दल विचार व्यक्त करण्याची ही स्वातंत्र्य नसते.  सामाजिक लोकशाही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वावर सामाजिक लोकशाही मधील समाज व्यवस्था आधारलेली असती. धर्म वंश भाषा श्रेष्ठ कनिष्ठ गरीब श्रीमंत अशा प्रकारचा भेदभाव येथे नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेला महत्त्व असावे असे अपेक्षित असते. काही क्षेत्रांमध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित होते. पण सामाजिक लोकशाहीचा अभाव दिसून येतो. उदाहरणार्थ अमेरिकेत राजकीय लोकशाही उच्च प्रतीची आहे  पण अजूनही तेथील कृष्णवर्णी यांना सामाजिक जीवनात सन्मानाचे आणि इतरांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त झालेली नाही. तसेच भारतात देखील लोकशाही आहे पण सामाजिक लोकशाही रुजलेली नाही. ही वास्तविकता नाकारता येत नाही . काही देशात सामाजिक तर काही देशात राजकीय लोकशाही नाही म्हणून सामाजिक आणि राजकीय लोकशाही परस्परपूर पूरक आहेत यासाठी दोन्हींचे अस्तित्व असणे आवश्यक आहे.

 आर्थिक लोकशाही आर्थिक लोकशाही हा राजकीय लोकशाहीचा पाया आहे . लोकशाही समाजवादात राजकीय आणि आर्थिक लोकशाहीला सारखेच महत्व देण्यात येते. राजकीय लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतर आर्थिक लोकशाहीच्या स्थापनेवर भर दिला जातो . प्रत्येकाला अर्थार्जण करण्याची आणि आपला स्वतःचा विकास करण्याची समान संधी प्राप्त होते.  म्हणजे आर्थिक लोकशाही होय समाजवादी विचारवंतांच्या मते उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची असावीत.  भांडवलशाही व्यवस्थेत उत्पादनाची साधने काही व्यक्तींच्या हातात केंद्रित झाल्यामुळे जनतेचे शोषण होते. त्यामुळे लोकांना आपला आर्थिक विकास करण्याची संधी प्राप्त होत नाही. अशा परिस्थितीत राजकीय लोकशाही अर्थहीन ठरते.

 आर्थिक लोकशाही जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापित होऊ शकत नाही . 

लोकशाहीचे वेगवेगळे प्रकार

 पहिला प्रकार आहे 

प्रत्यक्ष लोकशाही लोकशाहीच्या कारभारात लोकांचा सहभाग कोणत्या रीतीने होतो यावरून लोकशाही चे  प्रत्यक्ष लोकशाही व अप्रत्यक्ष व लोकशाही असे प्रकार आपण पाडत आलो आहोत.

 प्रत्यक्ष लोकशाहीचे आदर्श स्वरूप ग्रीक नगर राज्यामध्ये अस्तित्वात होते.  त्या नगर राज्यांचा कारभार करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी त्या त्या नगरातील सर्व नागरिक एकत्र येत असतआणि निर्णय घेत असत.  प्रत्यक्ष लोकशाही ही स्विझर्लंड या देशात काही प्रमाणात आढळते. तिथल्या नागरिकांना कायद्याचा मसुदा मांडण्याबाबत पुढाकार घेता येतो. आपल्या प्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार असतो. तिथले राज्यकर्ते काही प्रस्ताव निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांच्या सार्वमतला टाकू शकतात. तेवढ्यात संदर्भात तिथे प्रत्यक्ष लोकशाहीचे काही अवशेष अस्तित्वात आहेत असे म्हणायला जागा आहे. वार्षिक मेळाव्यात नागरिकांनी एकत्र येऊन राजकीय निर्णय घेण्याची प्रथा स्वित्झर्लंडमधील 26 पैकी फक्त पाच घटक राज्यात आढळते. 

दुसरा प्रकार प्रत्यक्ष लोकशाही किंवा प्राथमिक लोकशाही. प्रत्यक्ष किंवा प्राथमिक लोकशाहीत नागरिक निवडणुकी द्वारे आपले प्रतिनिधी निवडतात आणि ते प्रतिनिधी लोकांच्या वतीने राज्यकारभार पाहतात . प्राथमिक लोकशाहीचे अध्यक्ष व संसदीय असे दोन प्रकार आढळतात.  त्यातील पहिल्या प्रकारात म्हणजेच अध्यक्षीय लोकशाहीत कार्यकारी मंडळ व विधिमंडळ एकमेकापासून स्वतंत्र असते. अशा प्रकारची व्यवस्था अमेरिकेमध्ये आढळते . तर दुसऱ्या प्रकारच्या म्हणजेच संसदीय लोकशाहीत कार्यकारी मंडळ विधिमंडळास उत्तरदायी असते . आणि त्यांचा विश्वास असेपर्यंत सत्तेवर राहू शकते . ही व्यवस्था भारत व इंग्लंड या देशात आढळते.  नागरिक सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडतात.  हे प्रतिनिधी नागरिकांच्या वतीने शासन कारभार चालवतात . ते जनतेला उत्तरदायी आणि जबाबदार असतात. या प्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयांना, ठरवलेल्या धोरणांना जनतेची आदी मान्यता असते . जनतेला निवडणुकीच्या माध्यमातून शासनकर्त्यांना बदलण्याचा अधिकार असतो.  थोडक्यात प्रातनिधिक  लोकशाहीमध्ये जनता जरी प्रत्यक्ष शासन कारभारात सहभागी होत नसली तरी सत्तेची खरी सूत्रे जनतेच्याच हातात असतात . 

लोकशाही राज्यव्यवस्थांचे नवे वर्गीकरण 

आज जगात प्रचलित असलेल्या लोकशाही राज्यव्यवस्थांच्या प्रत्यक्ष कामकाजाचा आणि लोकशाही विषयक  सिद्धांतांचा आधार घेऊन लोकशाहीचे सहा प्रकारात वर्गीकरण करण्याचा एक प्रयत्न रॉकफेलर विद्यापीठातील प्राध्यापक आमी गहमन  यांनी केला आहे. ते वर्गीकरण अधिक वस्तुनिष्ठ वाटते ते पुढील प्रमाणे आहे-

 पहिला कार्यप्रणाली पूर्ती लोकशाही त्याला प्रोसिजरल डेमोक्रसी असे म्हटले जाते .शुम्पिटर ने केलेली लोकशाहीची व्याख्या अशी आहे की राजकीय निर्णयापर्यंत पोहोचण्याची ती एक संस्थात्मक व्यवस्था असते. त्या व्यवस्थित व्यक्तीची लोकांच्या मतांच्या स्पर्धात्मक लढ्यात विजयी होऊन निर्णय सत्ता स्वत: कडे घेतलेली असते . ती फक्त एक पद्धती या दृष्टीने लोकशाहीचा विचार करते .लोक मताचा पाठिंबा मिळवण्यासाठी केलेला स्पर्धात्मक संघर्ष व त्यातून मिळवलेली निर्णय सत्ता हाच लोकशाहीचा खरा आशय आहे असे त्याला वाटते . कपित्यालीझाम अंड डेमोक्रेसी या ग्रंथात पुढील पाच वैशिष्ट्यांचा त्याने उल्लेख केला आहे.

 राजकारणी माणसाची पर्याप्त गुणवत्ता, मर्यादित क्षेत्र,  प्रभावी व कार्यक्षम नोकरशाही लोकशाही आत्म संयमन आणि मतभेदा प्रति सहिष्णुता यांचा उल्लेख केला आहे.

 दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे लोकांनुयायी लोकशाही.  लोकांनुयायी लोकशाही अर्थ लोकांनी लोकशाहीचा अर्थ लोकांनी स्वतःच मुक्त समाज व स्वतंत्र व्यक्ती या दृष्टीने स्वतःवर राज्य करणे असा होतो. कोणत्याही बाह्य सत्तेने किंवा एखाद्या स्वयंनिर्वाचित गटाने राज्य करणे लोकांनुयायी लोकशाही विसंगत असते. राज्यकारभारासाठी जी शासन व्यवस्था यंत्रणा आवश्यक ठरेल ती अस्तित्वात असावी पण त्या यंत्रणेवर काही स्पष्ट मर्यादा घातलेल्या असणे अत्यावश्यक असते. राजसत्तेने  घेतलेले निर्णय लोकइच्छेशी  सुसंगत असावेत त्याखेरीज लोकशाही निर्णयामधून लोकांची इच्छा प्रतिबिंबित होण्याचा दुसरा मार्ग नाही .असे लोकांनुयायी लोकशाहीचे पुरस्कर्ते मानतात 

तिसरा प्रकार उदारमतवादी लोकशाही म्हणजेच लिबरल डेमोक्रेसी.  उदारमतवादी लोकशाहीचे पुरस्करते शासनाच्या लोकनिर्वाचित ते पेक्षा नागरिकांना मुक्त व समान व्यक्ति या नात्याने मिळणाऱ्या पायाभूत स्वातंत्र्यांना अधिक महत्त्व देतात. विचारांचे स्वातंत्र्य, अविष्काराचे स्वातंत्र्य ,संघटन स्वातंत्र्य ,धर्म स्वातंत्र्य ,खाजगी मालमत्ता बाळगण्याचे स्वातंत्र्य मतदानाचा अधिकार अटकेपासून व बंदीवासापासून व्यक्तीचे संरक्षण कायद्याचे अधिराज्य या गोष्टीवर उदारमतवादाचा कटाक्ष असतो. लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सत्ता केंद्रांना अमर्याद सत्ता मिळून नागरिकांची स्वातंत्र्य संकटात सापडू नयेत या दृष्टीने न्यायालयीन पुनर्विलोकन नियंत्रण व संतुलनाची तरतूद सत्ता विभाजनाचे तत्व यासारखी नियंत्रणे असण्यावर भर देताना  दिसतात. 

चौथा प्रकार आहे सहभागी लोकशाही म्हणजेच पार्टीसिपेटरी डेमोक्रसी. सहभागी लोकशाहीच्या समर्थकांच्या मते व्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण मिळण्यापेक्षा लोकांना राजकारणात सहभागी होण्याची संधी जास्त प्रमाणात मिळणे अधिक महत्त्वाचे असते. खरी लोकशाही नागरिकांच्या त्यांच्या कृतीशील सहभागातूनच साकार होत असते . समकालीन लोकशाही राज्यव्यवस्था त्यांच्या नागरिकांना प्रत्यक्ष  लोकशाहीच्या तुलनेत सहभागाच्या  फारच कमी संधी उपलब्ध करून दिल्यामुळे लोकांना राजकीय सहभागाचे मूळ कळेनासे झाले आहे. आज मतदार वर्ग अनभिज्ञ व उदासीन असतो.  मतदानाचे प्रमाण सगळीकडे कमी होत चालले आहे.,. राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण भरमसाठ वाढले आहे. आणि सार्वजनिक पदे धारण करणाऱ्या मध्ये बेजबाबदार पणा खूप वाढला आहे. सहभागी लोकशाहीच्या पुरस्कार त्यांच्या मते या सर्व गोष्टींसाठी आजच्या प्राथमिकच लीकाशाही स्वरूपच कारणीभूत आहे.  लोकांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने आधुनिक प्रसार माध्यमे मोलाची भूमिका पार पाडू शकतात असे त्यांना वाटते 

पाचवा प्रकार आहे सामाजिक लोकशाही सोशल डेमोक्रॉसी. पारंपारिक उदारमतवादाने काही गोष्टींना खाजगी ठरवून लोकशाही तत्वांच्या चर्चेपासून दूरच ठेवले होते. उदाहरणार्थ आर्थिक क्षेत्र, कुटुंब व्यवस्था आणि भारतासारख्या देशातील जातिव्यवस्था यांचा उहापोह  त्या विचारांच्या प्रवर्तकांना लोकशाहीच्या संदर्भात करावासा वाटला नव्हता. खरे पाहता परंपरेने खाजगी मांडल्या गेलेल्या या गोष्टींचा लोकशाहीवर नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि राजकीय समतेवर खूप आणि विविध प्रकारांनी परिणाम पडतो. ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे सामाजिक लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांचा असा आग्रह असतो की व्यक्तीच्या जीवनावर जुलमी सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित होऊ नये. असे जर वाटत असेल तर सत्तेवर कायदेशीर निर्बंध घालण्यापेक्षा किंवा केवळ लोकांच्या राजकीय सहभागाचे प्रमाण वाढवण्यापेक्षा सामाजिक लोकशाहीचा प्रसार करणे हाच त्यांच्या मते हमखास उपाय ठरू शकतो 

सहावा प्रकार आहे विचारशील डेलीब्रेटीव्ह डेमोक्रसी विचारशील लोकशाहीचे असे एकगृहीत  कृत्य आहे की लोक एकमेकांशी जोडले जातात ते केवळ आपल्या इच्छा दामटून किंवा आपल्या हित संबद्ध झगडून नव्हे पुरावे सादर करून मूल्यमापन मांडून आणि आणूनही करून एकमेकांना प्रभावित करूनच जोडले जात असतात लोकांची मने वळवणाऱ्या वादाद्वारे या प्रकारच्या लोकशाहीतील राजकारणी सामूहिक राजकारणाला आकार देत असतात मन वळवणी हा विचारशील लोकशाहीच्या दृष्टीने राजकीय सत्तेचा सर्वात समर्थनीय प्रकार असतो कारण तोच प्रकार व्यक्तीचे स्वायत्तता त्यांची स्वयंशासनाची क्षमता त्यांच्याशी सर्वाधिक सुसंगत असते राज्यातील सार्वजनिक उत्तरदायित्वाची जबाबदारी ज्या संस्थांवर असते त्यांना लोकजीवन प्रभावित करणाऱ्या सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात प्रोत्साहित करावे असा आग्रह विचारशील लोकशाहीचे समर्थक ठरतात यानंतर आपण लोकशाही तत्त्वांचा अभ्यास करून गतीचा नियम पाळत असताना लोकशाही विचार तत्त्वज्ञान स्वाभाविकपणे गतिमान राहिलेले आहे वेळोवेळी लोकशाही सिद्धांताने बदलाशी सुसंगत राहत आपली तत्त्वज्ञान विकसित केलेले आहे 

एक लोकांचे राज्य असते लोकांचे राज्य म्हणजेच लोकांकडून चालवले जाणारे शासन होय लोकशाही मधील अंतिम सत्ता सार्वभौमत्व हे लोकांचे असते राजकीय दृष्टीने तीच अखेरची सत्ता असते लोक स्वतंत्र होणे आणि ते सक्षम होणे हे उदारमतवादी लोकशाहीचे ध्येय आहे आधुनिक काळात अप्रत्यक्ष लोकशाही ही प्रौढ हक्काच्या मतदानातून मान्य झालेली आहे सार्वत्रिक  खुल्या नियमित निवडणुकांमधून लोकांची सत्ता व्यक्त होते आणि राजकीय सत्तेला आदी मान्यता मिळते दोन प्राथमिक लोकशाहीत बहुमताचे शासन राजकीय व्यवहार सुरळीत चालण्यासाठी व राजकीय स्थित्यंतर शांततामय पद्धतीने होण्यासाठी बहुमताची शासन हा लोकशाहीतील महत्त्वाचा नियम आहे निवडणुकीच्या पद्धतीत प्रचलित असलेल्या प्रत्येक  अधिकार प्रकारचे काही फायदे व मर्यादा आहेत मतदानाचा अधिकार पवित्र सर्वजण बजावतीलच असे नाही आणि त्याबाबत सक्ती करण्याबाबत ही दुमत आढळते प्रमाण तो पद्धत व्यावसायिक दुबार मतदान पद्धत इत्यादी अनेक पद्धतीचा वापर होत असला तरी प्रौढ सार्वत्रिक मतदान सर्वसामान्यता वापरण्यात येते अशा पद्धतीत संघटित अल्पमत बहुसंख्येने निवडून येणाऱ्या बहुमताचा आधार असेलच असे नाही बहुमताने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो 

लोकशाही ने व्यक्ति विषय विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे जनतेच्या सर्व महत्त्वाचा पुरस्कार करताना व्यक्तीचा विकास घडवून आणणे आणि त्यासाठी राज्याने अनुकूल बाह्य परिस्थिती निर्माण करणे हे राज्याचे कर्तव्य मांडले आहे उदारमतवादी विचारात व्यक्ती हित आणि समाज हित यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो व्यक्तिवादी सिद्धांत राज्याच्या कोणत्याही हस्तक्षेपाला विरोध करतात इतकी टोकाची भूमिका लोकशाही सिद्धांत घेत नाही आधुनिक राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांची नोंद करण्याची प्रथा आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा व्यक्ती विकासाच्या मूलभूत हक्काची नोंद रक्षणाची खास सुई राज्यघटनेत केलेली आढळते चार व्यक्ती विकासासाठी व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह व्यक्तिविकासासाठी राज्याने केवळ अनुकूल बाह्य परिस्थिती निर्माण करून न थांबता त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आणि समाज हितासाठी त्यावर काही बंधने आणावी लागली तर ती कमीत कमी व सामाजिक उपयुक्ततेच्या मर्यादेतच असली पाहिजेत जे एस मिलने व्यक्तीचे स्व संबंध आणि समाज संबंध असे दोन भाग पाडलेले असून स्व संबंधी क्षेत्रात त्याला संपूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे  असे म्हटले आहे पाच लोकांचा सहभाग लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग वाढावा म्हणून शासन प्रक्रिया अधिकारीक सहभागी करण्याकडे कल दिसून येतो शासकीय निर्णय प्रक्रियेत व अंमलबजावणीत लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी लोकांच्या निर्णयाचे क्षेत्र वाढविले जाते विकेंद्रीकरणातून हे शक्य होते तसेच शासनाच्या रचनेत विभागणी नियंत्रणाचा वापर करून समतोल निर्माण केला जातो जनतेचा सहभाग प्रशासन प्रक्रिया जिल्हा व खालील स्तरापर्यंत पंचायती राजव्यवस्थेने नेऊन वाढवलेला आहे सहा शासकीय व्यवस्थेचे विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण लोकशाही शासन व्यवस्था स्थिर करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावते .विकेंद्रीकरणाचा फायदा केवळ प्रशासकीय क्षेत्रा पुरता मर्यादित न राहता राजकीय दृष्ट्या ही व्यवस्थेला मान्यता देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. केंद्रीकरणाची तोटे त्यामुळे कमी होऊन राजकीय व्यवस्था लोकांना जवळची वाटू लागते .लोक ने लोकांची संमत्ती, विधिमंडळाचे सार्वभौमत्व आणि  बहुमताचे प्राथमिक शासन या कल्पनांचा पुरस्कार केला. मोन्तेस्कू ने सत्ता बाजनाची कल्पना लोकशाहीच्या संदर्भात पुढे आणली सात शासन जनतेला जबाबदार असते संसदीय व अध्यक्षीय शासन पद्धती हे प्राथमिक शासनाचेच भिन्न प्रकार आहेत या निर्णया प्रकारामुळे राज्याच्या व्यवस्थेत व शासन प्रणालीत जरी फरक पडत असला तरी त्यामुळे शासन जनतेला जबाबदार असते आणि जनतेच्या प्रतिनिधींच्या द्वारे आणि त्यांच्या नियंत्रणानुसार शासनाचे कार्य चालते या बाईच्या मूलभूत तत्वांना बाधा येत नाही यानंतर आपण

लोकशाहीची वैशिष्ट्ये पाहून

पहिलं वैशिष्ट्य आहे अंतिम निर्णय घेण्याची सत्ता जनतेकडे लोक शाही व्यवस्थेचे हे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन लोकशाहीची व्याख्या करताना असे म्हटले आहे की डेमोक्रेसी इस थे रूल ऑफ द पीपलफॉर द पीपल अँड बाय द पीपल याचा अर्थ जनतेला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारी ही शासन व्यवस्था आहे

राज्यातील सर्वोच्च सत्ता ही जनतेच्या हातात असल्यामुळे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा जनतेकडेच असतो लोकशाहीत जनता ही आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शासन चालवत असते जनतेकडून निवडले गेले असल्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय हे जनतेचे निर्णय असतात 

२)  मुक्त आणि सार्वत्रिक निवडणुका हे लोकशाहीचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे मुक्त आणि सार्वत्रिक निवडणुका शिवाय लोकशाहीचे अस्तित्व शक्य नाही या निवडणुकाद्वारे जनता आपले प्रतिनिधी शासन कारभारासाठी निवडते लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही आज शक्य नाही प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक शासन कारभारात सहभाग घेतो परंतु ते आज शक्य नाही परिणामी जनता अप्रत्यक्षपणे आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शासन चालवते हा अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार लोकशाहीमध्ये केवळ निवडणुका असून पुरेसा नाही जनतेपुढे विविध राजकीय पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे .या पर्यायामधून निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पसंतीचा पर्याय निवडते निवडणुकामुळे जनतेला केवळ आपले प्रतिनिधी निवडण्याचीच संधी मिळत नाही तर अस्तित्वात असलेले शासन बदलण्याची ही संधी मिळते 

तीन सार्वत्रिक प्रौढ मताधिकार गेल्या दोन दशकात लोकशाहीसाठी चाललेला संघर्ष प्रामुख्याने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार्‍यासाठीचाच संघर्ष आहे कोणत्याही भेदभावाशिवाय राज्यातील प्रत्येक प्रौढ नागरिकाला एक मत मिळाला हवे आणि त्या एका मतालाही मूल्य असायला हवे हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मतदानाचा अधिकार हा समाजातील विशिष्ट वर्गापुरता मर्यादित होता महिलांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले होते परंतु आता जगातील सर्वच राष्ट्रांनी महिलांनाही मतदानाचा अधिकार दिलेला आहे भारतात वर्षे पूर्ण केलेल्या भारतीय नागरिकाला कोणत्याही भेदभावाशिवाय पूर्व अटीशिवाय मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे

चार व्यापक राजकीय सहभाग लोकशाहीमध्ये जनतेचा राजकीय सहभाग हा व्यापक स्वरूपाचा असतो हा राजकीय सहभाग विशिष्ट अंतराने होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत असतो प्रौढ मताधिकार्‍यामुळे सर्वच नागरिक राजकीय प्रक्रियेत सहभागी होत असतात नागरिकांच्या व्यापक राजकीय सहभागावरच लोकशाहीची यशस्वीता अवलंबून असते विकसित राष्ट्रात नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो त्या प्रमाणात अविकसित राष्ट्रात सहभाग हा अल्प असतो

पाच सत्तेचे विकेंद्रीकरण लोकशाही शासनात सत्तेचे विकेंद्रीकरण महत्वाचे असते लोकशाहीत कोणत्याही घटकांकडून सत्तेचा गैरवापर होऊ नये यासाठी सत्ता विभाजन आवश्यक असते कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ यांच्यात अधिकाराची विभागणी केलेली असते केंद्रीय पातळीपासून ते ग्रामपातळीपर्यंत सत्तेच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून सर्वसामान्य नागरिकांनाही राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाते

सहा स्पर्धात्मकता स्पर्धात्मकता हे लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे विविध राजकीय पक्ष सत्ता प्राप्तीसाठी निवडणुकीच्या रिंगणात असतात निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करण्यासाठी त्यांच्या चढाओढ असते या बहुलतेमुळे नागरिकांनाही पर्याय उपलब्ध होतात भारतात बहुपक्ष पद्धतीमुळे ही स्पर्धात्मकता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आढळते सात घटनात्मक कायदा आणि जन अधिकाऱ्यांना केंद्रस्थान

लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे घटनात्मक कायदा आणि जन अधिकाऱ्यांना असलेले केंद्रस्थान निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या प्रत्येक शासनाला घटनात्मक कायद्याच्या चौकटीतच राहून राज्यकारभार करावा लागतो घटनात्मक कायदा हा राज्याचा सर्वोच्च कायदा असून तो सर्वांसाठी समान असतो घटनात्मक कायद्याने जनतेलाही काही नागरी आणि राजकीय अधिकार बहाल केलेले असतात या अधिकारांचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे शासनाकडून या अधिकारांची उल्लंघन झाल्यास व्यक्तीला न्यायपालिकेकडे दाद मागण्याचा अधिकार असतो हे अधिकार लोकशाहीतील राजकीय सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत यानंतर आपण

लोकशाहीच्या गुण दोषांची चर्चा करून लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये प्रमुख गुणदोष खालील प्रमाणे सांगता येतील लोकशाहीचे गुण

पहिला गुण आहे समता स्वातंत्र्य बंधुता या तत्त्वांना पोषक लोकशाही शासन व्यवस्था ही स्वातंत्र्य समता बंधुता या तत्त्वांना पोषक आहे लोकशाही हा एकमेव शासन प्रकार असा आहे की जिथे प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतःचे असे मोल असते आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विकासाची अमर्याद सूक्त शक्यता दडलेल्या असतात असे गृहीत धरले जाते प्रत्येकाला स्वतःच्या सुप्त गुणांचा व मानवी व्यक्तिमत्त्वाचा जास्तीत जास्त विकास करण्याची संधी पुरविली जाते लोकशाही शासन व्यवस्थेत सर्वांचे मिळते समान हक्क व स्वातंत्र्य दिली जातात आणि सर्वांचे परस्परांशी असलेले संबंध बंधुभावाचे राहतील असे प्रयत्न केले जातात

दोन हितसंबंधांचे संरक्षण लोकशाहीमध्ये समाजातील सर्व लोकांच्या हितसंबंधांचे संरक्षण होते लोकशाहीत सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करणारे शासन असल्यामुळे जनतेचे प्रश्न शासनाला माहीत असतात आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्नही केले जातात

तीन कल्याणकारी भूमिका आधुनिक काळात लोकशाही शासन व्यवस्थांनी कल्याणकारी भूमिका स्वीकारली असून या शासन व्यवस्था सामाजिक प्रगतीसाठी वचनबद्ध आहेत जनतेचे अधिकाधिक कल्याण करणे हे या शासनाचे उद्दिष्ट असते त्यानुसार विविध विकास योजना राबवल्या जातात

चार लोक मताला प्राधान्य लोकशाही ही लोकमत किंवा जन्मताला प्राधान्य देणारी शासन पद्धती आहे लोकशाहीत शासन हे लोक मताचे प्रतिनिधित्व करणारे असते कोणताही निर्णय घेताना किंवा धोरण ठरविताना लोक मताचा विचार केला जातो राज्यकर्त्यांवर लोक मताचा सातत्याने दबाव असतो

पाच विकेंद्रीकरण लोकशाही शासन व्यवस्था ही वीकेंद्रीकरणाच्या तत्त्वावर आधारलेली असते या पद्धतीत सत्ताही विविध पातळ्यांवर आणि विविध गटांमध्ये विभागली जाते सत्ता विभागणीमुळे परस्पर समतोल आणि नियंत्रण साधले जाते कोणताही निर्णय परस्पर विचार चर्चेतून घेतला जातो. लोकशाही विकेंद्रीकरणामुळे निर्णय निर्मिती प्रक्रियेत अधिकाधिक लोकांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न होतो

सहा जनशक्ती श्रेष्ठ लोकशाहीत सत्तेची अंतिम सूत्रे ही जनतेच्या हातात असतात जनता आपले प्रतिनिधी निवडून देते हे प्रतिनिधी आपल्या कार्यासाठी जनतेला जबाबदार असतात या पद्धतीत शासन निरूंकुश बनण्याची किंवा एकाधिकारशाही पणे वागण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही राज्यकर्त्यांमध्ये जबाबदारीची जाणीव असते

सात राजकीय प्रशिक्षण लोकशाही हे जनतेला राजकीय प्रशिक्षण देणारी त्यांना स्वयंनिर्णयाची कला शिकवणारी प्रयोगशाळा आहे या पद्धतीत सर्व जनतेला राजकीय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो

आठ शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य लोकशाही शासन व्यवस्था शांतता आणि सुरक्षिततेच्या तत्त्वांना प्राधान्य देणारी आहे या पद्धतीत सत्तांतराच्या प्रक्रिया देखील शांततेच्या आणि घटनात्मक पद्धतीने होते जनता निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करून शांतता आणि सुरक्षितता व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी उपकारक ठरते

लोकशाही समोरील आव्हाने

उदारमतवादी लोकशाही संकल्पनेने औद्योगिक व विकसित अशा समाजात राजकीय आर्थिक स्थैर्य निर्माण केले त्यामुळे विकसनशील व नवोदित देशातही लोकशाही शासन पद्धती विषयी आकर्षण निर्माण झाले आंतरराष्ट्रीय समाजात स्थान आणि प्रतिष्ठा मिळवण्याच्या दृष्टीने सामान्य लोकांबरोबर नवोदित राज्यांनाही लोकशाहीचे महत्त्व वाटू लागले आहे असे असले तरीही लोकशाही समोर पुढील आव्हाने आहे

एक लोकांमधील जागरूकतेचा अभाव लोकशाहीच्या यशासाठी सामान्य जनता सतत जागरूक असणे आवश्यक आहे अखंड जागरूकता ही लोकशाहीसाठी किमती आहे प्राथमिक लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींवर सतत लक्ष ठेवूनच त्यांना लोक मताच्या मार्गावर ठेवता येते जागृत लोक असे नियंत्रण ठेवू शकतात तेच जर निष्क्रिय बेफिकीर राहिले की साधने जवळ असल्याने लोकप्रतिनिधी आपल्या हिताचे रक्षण करतील हा लोकशाही व्यवस्थे पुढील महत्वाचा प्रश्न आहे.मतदानाचा हक्क हे लोकांच्या हातात असलेले हत्यार आहे त्याचा लोकांनी जागृतपणे वापर करण्यावरच लोकशाहीचे यश अवलंबून आहे लोकांनाच लोकशाही विषयी आस्था नसेल किंवा इर्षा नसेल तर लोकशाहीला भवितव्य राहणार नाही

दोन लोक सहभागाच्या मर्यादा लोकसहभागावर लोकशाहीचा जिवंतपणा अवलंबून असतो लोकसहभाग वाढवण्यासाठी समाजात सर्व क्षेत्रात समानता असणे आवश्यक आहे समाज रचनेत समतल रचना असल्यास सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रक्रियांचे क्षेत्र वाढू शकते व त्याचा लोकांवर अधिक प्रभाव पडत असल्याने लोकांची लोकशाही विषयी आस्था अधिकच वाढेल लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक बाबी लोकशाही हा सर्वोत्तम शासन प्रकार असला तरी त्या आदर्श स्वरूपात आज तो जगात कुठेही अस्तित्वात आहे असे म्हणता येणार नाही त्या आदर्शांकडे जाण्याचा प्रयत्न प्रत्येक लोकशाही देश आपल्या परीने करत आलेला आहे फार झाल्यास आपण असे म्हणू शकतो की लोकशाही यशस्वी होण्यासाठी ज्या काही पूर्व शर्ती असतात त्या विशिष्ट देशात किती प्रमाणात पूर्ण होतात यावर तो देश लोकशाहीच्या आदर्शांच्या किती जवळ जाऊ शकतो हे अवलंबून असते

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी पुढील बाबींची नितांत आवश्यकता असते

एक आर्थिक व सामाजिक विषमता वाजवीपेक्षा जास्त नसावी समाजातील गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी जर खूप असेल तर सामाजिक दृष्ट्या खालचे मांडले गेलेले तसेच गरीब वर्गात असणाऱ्या लोकांना राजकीय हक्क स्वतंत्र स्वरूपात वापरता येणार नाहीत श्रीमंत वर्ग आपल्या अर्थसत्तेच्या जोरावर बळावर राजकीय समानता पूर्णपणे निरर्थक बनवतील तेव्हा लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सर्वात पहिली आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे समाजात सामाजिक व आर्थिक विषमता एवढी असू नये की कनिष्ठ वर्गीयांना वरचढ समाज घटकांच्या मर्जीवर विसंबून राहणे भाग पडेल

दोन शिक्षणाच्या सोयी पुरेशा प्रमाणात असाव्यात समाजात शिक्षणाचे प्रमाण किती आहे यावर लोकशाहीचे यश अवलंबून आहे प्राथमिक माध्यमिक उच्च अशा सर्वच पातळ्यांवर समाज व्यापी कार्यक्रम व शिक्षण व्यवस्था ज्या देशात नसेल तिथल्या लोकशाहीचे भवितव्य संकटात आल्यापासून राहणार नाही लोकशिक्षण हा लोकशाहीसाठी महत्त्वाचा भाग असतो त्यासाठी आवश्यक असलेली माध्यमे अस्तित्वात असणे गरजेचे आहे तीन विवेक पूर्ण लोकमत अस्तित्वात असावे लोकशाही हे लोक मतानुसार चालणारे राज्य असते त्यामुळे शासनाला मार्गदर्शन करू शकेल अशा स्पष्ट व सुसंगत स्वरूपात समाजातील लोक मताचा कल सतत व्यक्त होत राहणे गरजेचे असते समाजात जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत तेथे लोकशाही शासन अस्तित्वात येण्याची शक्यता फारच थोडी असते चार लोकांचे संघटन व नेतृत्व लोकशाही यशस्वी होण्यासाठी लोकांचे योग्य प्रकारे संघटन असावे व त्यांना चांगले नेतृत्व लाभावे समान हितसंबंधाच्या आधारे लोक एकत्र येतात त्यातून दबाव गट व राजकीय पक्षांचा उदय होतो संघटनांच्या कार्याला दिशा लाभणे व त्यात सातत्य राखले जाणे आवश्यक असते हे बहुतांश त्यांना लाभणाऱ्या नेतृत्वावर अवलंबून असते बुद्धिमान प्रामाणिक निस्वार्थी नेते जनतेला योग्य मार्गदर्शन करू शकतात संघटनेला शिस्त लावू शकतात निर्णय करता पर्यंत जनतेचे म्हणणे प्रभावीपणे पोहोचवू शकतात पाच लोकांचा लोकशाहीवर विश्वास असावा लोकशाहीच्या तत्त्वावर आणि कार्यपद्धतीवर लोकांचा विश्वास नसेल तर किरकोळ कारणानेही ते असनदशीर व बेकायदेशीर मार्गाकडे वळण्यास प्रवृत्त होतील हे स्पष्ट आहे लोक वारंवार अशा मार्गाचा अवलंब करू लागले की राज्यकर्त्यांना दमनाचा मार्ग जवळ करायचे कारण मिळते आणि देशातील लोकशाहीचा अस्त जवळ आल्याचेही ते लक्षण मानले जाते म्हणूनच भारतातील सुजान नागरिकांनी लोकशाही वर दृढ विश्वास ठेऊन ती यशस्वी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभागी झाले पाहिजे कारण निवडणुकीच्या माध्यमातूनच भारतात लोकशाही राबवली जाते त्यामुळेच आता आपण निवडणुका संबंधी सविस्तर माहिती करून घेऊ.


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ